प्रेम म्हणजे??
प्रेम .. तसं म्हणलं तर कित्ती सोप्पं .. पण सांगायचे म्हणले तर भल्या - भल्यांचे तोंड बंद होतील . वारा कोणी पाहीलाय ? देव कुणाला दिसलाय ? पण म्हणुन काय कोणी त्याचे अस्तित्व नाकारते का ? प्रेमाचे अगदी तस्संच आहे . प्रेमाचा अविष्कार तुम्हाला कधी , कुणाच्या रुपात , कुणाकडुन होईल हे कोणीच सांगु शकत नाही . बऱ्याच लोकांच्या मते , प्रेम ही एक मानसीक आणी शारीरीक भावना आहे . जेव्हा तुमचा “ तो ”, किंवा “ ती ” तुमच्या आयुष्यात येते , तेव्हा तुम्हाला आपोआपच प्रेमाची जाणीव होते . अंगावर रोमांच येणे , पोटात गोळा येणे , तासं - तास शुन्यात नजर लावुन बसणे अश्याप्रकारची अनेक लक्षणे तुम्हाला प्रेमाने झपाटलेल्यांमध्ये दिसुन येतात . पण हे खरंच प्रेम असते का ? मी बराच विचार केल्यावर असं लक्षात यायला लागले की “I Love You”, किंवा “ माझे तुझ्यावर प्रेम आहे ” किंवा आणखी काही .. आजकाल आपण जरा जास्तीच मुक्तपणे वापरतो . आजकाल कशाला .. मला आठवतेय मी आठवीत असतानाच माझ्या एका मैत्रीणीला “I love You” म्हणालो होतो...